प्लाझ्मा म्हणजे काय ?आणि ते कसे काम करते

जाणून घ्या "बिबट्या" त्याच्या "सवयी" आणि "शिकार" करण्याची पद्धत !

आपल्यासमोर जेव्हा एखादे संकट येते तेव्हा त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपली तयारी असावी लागते तरच आपण ते संकट दूर करू शकू, त्यासाठी आपल्याला ते संकट आणि त्याच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, त्यामुळेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक संकट आले आहे, त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी  त्याबद्दल महत्वाची माहिती देत आहे जेणे करून या माहितीच्या आधारे सावध राहू शकू, चला तर सुरु करूयात. 
बिबट्या हा प्रामुख्याने मांजर या जातीचा आणि पिवळसर कातडी असनारा व त्यावर गडद काळे ठिपके असनारा प्राणी आहे, पण काही बिबटे संपूर्ण पणे काळे असू शकतात त्यांना पँथर असे म्हणतात.
त्यांची शरीर रचना, त्यांचे पाय मध्यम आकाराचे तर शरीर लांब असते, कवटीच्या आकार हा मोठा असतो.त्यांना मोठी मांजर असे सुद्धा म्हणतात त्यांचा आकार वाघ, सिंह यांपेक्षा लहान असतो, ज्या ठिकाणी वाघ किंवा सिंह नाही त्याठिकाणी राहणे ते पसंद करतात.
सहवास -  डोंगराळ भाग, वन, गवताळ भाग, वर्षावन  अशाठिकानी यांचा सहवास जास्त आढळतो. 
बिबट्या हा एका रात्रीत एक ते पंचवीस कि.मी  चा प्रवास करू शकतो त्याला त्रास दिल्यास किंवा धोका वाटल्यावर तो एका  रात्रीत पंचाहत्तर कि.मी  पर्यंतचा प्रवास करू शकतो. 
शिकार पद्धत - 
मुख्यतः रात्री शिकार करणे या प्राण्यास पसंत आहे, दिवसा सुद्धा शिकार करू शकतो.
बिबट्याचे वास्तव्य हे झाडावर जास्त असते, तो त्याचा सर्वात जास्त वेळ हा झाडावर घालवतो तर लपण्यासाठी सुद्धा झाड किंवा दगडांचा वापर करतो. 
शिकार करण्यासाठी त्याला त्याची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता महत्वाची ठरते, बिबट्या जमिनीवरून किंवा झाडांवरून सुद्धा शिकार करू शकतो,
शिकारीसाठी मुख्यतः 10-50 किलो वजन असनारे प्राण्यांना प्राधान्य देतो पण 550 किलो  वाजनापर्यंत चे प्राणी मारण्याची क्षमता त्यामध्ये आहे, बिबट्याने आतापर्यंत मारलेल्या सर्वात मोठ्या शिकारीचे वजन 900 किलो आहे. पण जे प्राणी त्याच्यावर हल्ला करू शकतात त्यांची शिकार तो टाळतो. बिबट्या दररोज 3.8 किलो मांस खाऊ शकतो.बिबट्या 58 कि.मी प्रती तास या वेगाने धाऊ शकतो,तर 
20 फुट उंच आणि 10 फुट लांब उडी सहज मारू शकतो.
बिबट्या हा 2-3 दिवसाला पाणी पितो, पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओल्या वनस्पती, आंबट गवत सुद्धा खातो .
शिकार करण्यासाठी बिबट्या शक्य होईल तेव्हडे आपल्या शिकारीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो ते अंतर 16 फुटांपेक्षा कमी असते आपले संपूर्ण शरीर जमिनीला टेकवून आपले पंजे जमिनीला रोवून पूर्ण वेगाने आपल्या शिकार पकडण्यासाठी धावतो आणि शिकारीच्या मानेवर आपला जबडा रोवून हिसके दवण्यास सुरुवात करतो गळ्यामध्ये त्याचे तीक्ष्ण दात रोवल्याने शिकार लगेच मरण पावतो.
बिबट्याचा जबडा हा एव्हडा शक्तिशाली असतो कि त्यामध्ये स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजन जबड्यामध्ये पकडून झाडावर नेण्याची क्षमता असते, आपली शिकार झाडावर किंवा गुंफेत नेऊन खाणे त्यांना पसंत असते.

1.पवित्रा घेणे  2. धावणे   3. शिकार मारणे    4.झाडावर नेणे

बिबट्यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे 

1) कुत्रा सोबत ठेवा - 
बिबटया हा खूप शांतपणे हल्ला करणारा प्राणी आहे कुठलाही आवाज न करता तो आपली शिकार पकडतो त्यामुळे आपल्यासोबत  कुत्रा जर असेल तर आपण अगोदर सावध होऊ शकतो कारण कुत्रा कितीही लहान आवाज ऐकू शकतो, महत्वाचे म्हणजे त्याची वास घेण्याची क्षमता, कुत्रा काही किलोमीटर अंतरावरून सुद्धा एखाद्या प्राण्याचा किंवा काही गोष्टींचा वास घेऊन आपल्याला भुंकून सावध करू शकतो 

2) बिबट्याचा पाठलाग करू नका 
तुम्हाला जर कुठे बिबट्या दिसला तर त्याच्यापासून दूर राहा त्याचा पाठलाग करू नका अशाने तो तुम्हाला पाहून तुमच्यावर हल्ला करू शकतो. 

3) बिबट्या समोर आल्यावर पळू नका 
जर बिबट्या तुमच्या समोर आलाच तर धाऊ नका, तुमचे धावणे तुम्हाला कमकुवत ठरवते त्याने बिबट्याची हिम्मत  वाढून तुम्हाला धरू शकतो. त्यामुळे हळू हळू मागे सारका एकदम वळून धावू नका 

4) स्वतःला मोठे आणि घातक दाखवण्याचा प्रयत्न करा 

स्वतःला शक्य होईल तेव्हडे  घातक दाखवण्याचा प्रयत्न करा, आपले हात वर उंचावून हलवा, टाळ्या वाजवा, शिट्टी वाजवा, मोठ्याने ओरडा, बिबट्या त्याच्यासाठी घटक वाटणारी प्राण्यावर हल्ला करत नाही. 

5) जर हल्ला झालाच तर 

जर तुमच्यवर हल्ला झालाच तर सर्वप्रथम तुमच्याकडे काही तिखन  वस्तू किंवा हत्यार असल्यावर बिबट्याच्या छातीवर आघात करावा अशाने तो मागे सरकेल व पुन्हा हल्ला करायचा की नाही याचा विचार करेल कारण आपण त्याच्यावर वरचढ ठरू.
तरीसुद्धा हल्ला झालाच तर त्याला विरोध करू नका किंवा जास्त हालचाल झटापट करू नका.
आपला श्वास कमी करून डोळे बंद करा.
आपले गुढगे पोटाजवल घेऊन आपल्या हाताने आपल्या मानेचे व गळ्याचे रक्षण करा कारण हा प्राणी मानेवर आपले दात रोवत असतो.
मदतीसाठी आवाज द्या.

बिबट्याला सामोरे न जाणे हा सर्वात चांगला उपाय आहे त्यासाठी आपण नेहमी आपल्या आजूबाजूला येणारे आवाज यावर लक्ष्य ठेवणे गरजेचे कारण आपल्याला जर माहित असेल बिबट्या कशा प्रकारे आवाज करतो तर आपण दुरूनच  त्याला ओळखु शकू त्यासाठी त्याचे आवाज असलेल्या व्हिडिओ लिंक खाली देत आहे .