प्लाझ्मा म्हणजे काय ?आणि ते कसे काम करते

 गेल्या वर्षीपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे हे आपल्या सर्वाना माहित आहे, या आजाराच्या उपचारासाठी रेमडेसिविर सोबतच अजून एका गोष्टीची मागणी आहे ते म्हणजे प्लाझ्मा, सर्वजण आपल्याला प्लाझ्मा दान करायला सांगत आहेत, प्लाझ्मा म्हणजे काय ? आणि कोरोनाविरुद्ध कसे काम करते ते आपण पाहूया.

1) प्लाझ्मा म्हणजे काय ? :-

          प्लाझ्मा म्हणजे रक्तामधील पिवळा रंग असलेला द्रव भाग आहे,ज्यामध्ये प्रतिपिंडे (antibodies) असतात.



2) कार्य :-

        प्लाझ्मा मध्ये ऍन्टीबॉडीज असतात, ऍन्टीबॉडीज हे शरीराने संसर्गाविरुद्ध बनवलेले प्रथिने (protiens) असतात, ज्या रुग्णांना आधी कोरोनाची लागण होऊन तो पूर्णपणे बरा झालेला आहे अशा रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या ऍन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात, याच एन्टीबॉडीज प्लाझ्मा द्वारे कोरोना रुग्णांना दिल्यास त्यांना बरे होण्यास मदत करतात.

एफ.डी. ए . ने जारी केले आहे कि आपत्कालीन परिस्थितीत कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा वारता येऊ शकतो.


                        (ऍन्टीबॉडीज ची रचना)

3) प्लाझ्मा कोण दान करू शकतात ? :-

    ज्यांना आधी कोरोना लागण झाली होती व ते आता पूर्णपने बरे झालेले आहेत अशा व्यक्ती कमीत कमी दोन आठवड्यानंतर प्लाझ्मा दान करण्यास हरकत नाही, त्यामुळे इतरांचे प्राण वाचण्यास मदत होईल.



4) ज्यांना कोरोना झालेला नाही ते प्लाझ्मा दान करू शकतात का? :-

     नाही ! ज्यांना आधी कोरोना लागण झालेली नाही त्यांनी रक्त दान करावे, एकदा रक्तदान केल्याने तीन व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात. 


                         (प्लाझ्मा आणि रक्त)