साप...!! अस कोणी ओरडले तर पळता भुई थोडी होते, धावाधाव शोधाशोध सुरु होते, त्याचे कारण ही तसेच असते. आज अशाच एका सापाची माहिती घेणार आहोत त्याच नाव आहे
इनलँड ताइपन त्याच वैज्ञानिक नाव
ऑक्सियुरनस माइक्रोलेपिडॉट्स आहे.
हा साप एलापिंडी या जातीतील आहे मुख्यत्वे हा साप पश्चिम ऑस्ट्रेलिया च्या अर्ध शुष्क भागात आढळतो काळ्या मातीत याचे वास्तव्य आढळते.
सर्वात अगोदर या सापाची ओळख 1882 मध्ये फ्रेडरिक मॅकेकोय यांनी करून दिली त्या नंतर 1882 मध्ये जॉन मॅक्लि याने त्याचे वर्णन केले त्या अगोदर हा साप अज्ञात होता, यांनी या सापाची ओळख करून दिल्यानंतर सुद्धा 80-90 वर्षे हा साप अज्ञात राहिला कोणीही या बद्दल माहिती गोळा करू शकले नाहीत.
विष :-
हा साप बाकी सापांच्या तुलनेत जास्त विषारी आहे,
एका चाव्या मध्ये हा साप 100 पूर्ण विकसित पुरुषांना मारू शकतो तर जवळपास 2.5 लाख उंदीर सहज मरु शकतात. एका मिनिटाच्या आत पूर्ण विकसित पुरुषाचे प्राण जाऊ शकतात, एका चाव्यामध्ये हा साप 40 मिली ग्राम ते 110 मिली ग्राम विष सोडतो. तर किंग कोब्रा एका च्या एका चाव्या मध्ये 20 पुरुष मरु शकतात.
हा साप शांत आणि लाजाळू असल्याने माणवाशी संपर्क कमी येतो त्यामुळे याला जास्त घातक समजले जात नाही, काही अडथळा आल्यावर हा साप आपला मार्ग बदलणे पसंत करतो.
आकारणे हा साप लांबीला 5.9 फूट ते पूर्ण विकसित 8.2 फूट पर्यंत वाढतो. या सापमध्ये वातावरणानुसार रंग बदलण्याची क्षमता असते, उन्हाळ्यात फिक्कट तर हिवाळ्यात गडद रंग अशा प्रकारे आपले शरीर गरम ठेवतो.
जगातील पहिले 10 मध्ये येणारे विषारी साप
1. इनलँड ताइपन (Inland Taipan)
2. सॉ स्केलेड वाइपर (Saw-scaled viper)
3. किंग कोब्रा (King Cobra)
4. ब्लू क्रेट (Blue krait)
5. ब्लॅक माम्बा (Black Mamba)
6. टाइगर स्नेक (Tiger Snake)
7. रस्सेल वाइपर (Russell Viper)
8. कॉमन डेथ अड्डेर (Common Death Adder)
9. मोजाव रॅटल स्नेक (Mojave Rattlesnake)
10. बेलचेर्स सी स्नेक ( Belcher's Sea Snake)