प्लाझ्मा म्हणजे काय ?आणि ते कसे काम करते

दुबई मध्ये 99% पिण्याचे पाणी समुद्रापासून मिळवले जाते! पहा समुद्राचे पाणी पिण्यायोग्य कसे बनवले जाते ?

कच्या तेलाचा भरपूर साठा असलेला देश म्हणुन आपण सर्वच ओळखतो. पैसा, गाडी ,बंगला, याची कोणाकडेच कमतरता नाही सर्वच श्रीमंत. याच देशात पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी समुद्रापासून पिण्यायोग्य बनवलेले पाणी वापरले जाते. आपल्याला माहित आहे समुद्राचे पाणी खारे असते समुद्राचे पाणी पिल्याने एखाद्याचा जीव हि जाऊ शकतो मग ते लोक हे कस करतात. तर विज्ञानात तेव्हडी प्रगतीही झाली आहे आपण पाण्यातील मीठ, क्षार किंवा इतर विरघळलेले  पदार्थ सहज वेगळे करू शकतो आणि पिण्यायोग्य शुद्ध पाणी तयार करू शकतो. 
यासाठी विज्ञानात काही कृती दिल्या आहेत किंवा पद्धती दिल्या आहेत, ती पद्धत म्हणजे पृथक्करण.(DESALINATION)  तर पृथक्करण म्हणजे काय 
पृथक्करण - 
पाण्यामधून क्षार, मीठ आणि इतर खनिजे वेगळे करणे याला पृथक्करण म्हणतात 
याचे विविध प्रकार आहेत उदा. 1.रिव्हर्स ऑस्मॉसिस
2. सोलार डिस्टीलेशन 3.वॅक्युम डिस्टीलेशन 4.थर्मल डिस्टीलेशन. 
पृथक्करण चा सर्वात मोठा प्लांट दुबई मध्ये आहे तेथे दर वर्षी 300 दशलक्ष घनमीटर पाणी तयार केले जाते 
 अशाप्रकारे पाणी त्या ठिकाणी मिळवले जाते जिथे पिण्यायोग्य पाणी कमी आहे उदा. जहाज . पाणबुड्या या कित्तेक महिने सुमुद्रात राहत असतात त्यासाठी सुद्धा या पद्धतीचा वापर होतो. 
पिण्यायोग्य पाणी मिळवण्याची सर्वात सोपी पद्धत आपण पाहूया जी दुबई मध्ये वापरली जाते. 

रिव्हर्स ऑस्मोसिस  -- (उत्क्रम परासरण) 

 येथे कमी concentration म्हणजे - गोडे पाणी समजू 
जास्त concentration म्हणजे - खारे पाणी समजू 
Concentration - साद्रता
Semipermeable membrane- अर्धव्यापक झिल्ली

 ऑस्मोसिस म्हणजे, जेव्हा  वेगवेगळी concentration ( साद्रता) असणारे दोन द्रव्ये अर्धव्यापक झिल्लीद्वारे( semipermeable membrane-आपण  विटेसारखा पडदा समजुया याचे कार्य पुढे सांगतो आहे) वेगळे केले असता . कमी concentration असणारे द्रव्य जास्त concentration असणाऱ्या द्रव्याकडे वाहू लागते . 
हे आपण आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरण वापरून समजून घेऊ. 
आपण भाजी करण्यासाठी कडधान्य भिजवतो, समजा आपण एका भांड्यात हरभरा किंवा मूग घेतले आणि त्या भांड्यात पाणी ओतले आणि आठ तास आपण तसेच राहू दिले तर काय होईल? 
त्या भांड्यातील पाणी आधीच्या तुलनेत कमी दिसेल आणि हरभरा किंवा मूग यांच्या आकारात बदल दिसेल ते आधीपेक्षा मोठे झाले असतील असे का बर झाले? 
असे झाले कारण तिथे  ऑस्मोसिस झाले हरभऱ्याचे concentration हे जास्त होते कारण त्यामध्ये मोठया प्रमाणात क्षार आहेत त्यामुळे कमी concentration असलेले पाणी हरभाऱ्याकडे खेचले गेले. हीच प्रक्रिऊ उलटी करणे म्हणजे रिव्हर्स  ऑस्मोसिस होय. 
म्हणजेच जास्त concentration असलेले द्रव्य कमी concentration असलेल्या द्रव्याकडे आणणे. 
हि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, एका कम्पार्टमेंट मध्ये दोन वेगवेगळी concentration असलेली द्रव्ये घेतली जातात जी semipermeable membrane ने वेगळी केलेली असतात व जास्त concentration असलेल्या द्रव्याच्या बाजूने  बल लावले जाते जे कि ओस्मेटिक प्रेशर पेक्षा जास्त जास्त असते त्यामुळे जास्त concentration असलेले द्रव्य कमी  concentration असलेल्या द्रव्याकडे जाऊ लागते . या बलामुळे मध्ये असलेल्या semipermeable mebrane मधून ते जाते हे semipermeable membrane क्षार, मीठ खनिजे आणि इतर घटक पास जाऊ देत नाही त्यामुळे फक्त शुद्ध पाणीच यामुधून पुढे सरकते  आणि  समुद्राचे किंवा खारे  दूषित पाणी पिण्यायोग्य होते