प्लाझ्मा म्हणजे काय ?आणि ते कसे काम करते

काय आहे नार्को टेस्ट जी गुन्हेगारांकडून सत्य काढून घेण्यास मदत करते ?

गुन्हेगार आणि पोलीस यांच्यातील वैर आपल्या सर्वांनाच माहित आहे, पोलीस आपली चाणाक्ष बुद्धीने कुठल्याही गुन्ह्याची पाळेमुळे उखळून टाकतात काही तपास तर काही तासातच पूर्ण करतात पण काही केस  मध्ये हे शक्य होत नाही, फक्त तर्क लाऊन अंदाज लाऊन होत नसेल तर विज्ञानाच्या मदतीने ते शक्य करतात, त्यासाठी मदत होते नार्को टेस्ट ची, 
नार्को टेस्ट करायची असेल तर ते सहज होपे नाही, नार्को टेस्ट करायची आहे उचला गुन्हेगार आणि जाउद्य टेस्ट करायला असे होत नाही, 
नार्को टेस्ट करायची असेल तर न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे  त्याच बरोबर ज्या व्यक्तीची टेस्ट करायची आहे त्या व्यक्तीचीही परवानगी असणे आवश्यक आहे. 
नार्को टेस्ट करण्याआधी व्यक्तीचे मानसीक शारीरिक स्वास्थ्य तपासणे गरजेचे आहे कारण या टेस्ट दरम्यान व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो किंवा कोमा मध्ये सुद्धा जाऊ शकतो. 
नार्को टेस्ट करण्यासाठी त्या व्यक्तीला "सोडियम पेंटोथाल किंवा सोडियम अमाइटल"  चे इंजेक्शन दिले जाते. 
या इंजेक्शन चा परिणाम असा होतो कि व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध हि होत नाही आणि पूर्ण शुद्धीवर हि राहत नाही ज्याला आपण आपल्या लाडक्या भाषेत गुंगी असे म्हणतो हा अवस्थेत त्याने केलेल्या गुन्हयाशी संबंधीत सर्व प्रश्न विचारले जातात या अवस्थेत तो व्यक्ती खोटे बोलण्याचे प्रमाण कमी असते कारण या औषधामुळे मेंदूतील कार्य हे जटिल बनते, जेव्हा आपण खोटे बोलत असतो तेव्हा आपल्याला जास्त विचार करून आणि काही गोष्टी बनून सांगाव्या लागतात त्या सांगण या अवस्थेत शक्य होत नाही त्याउलट मेंदू जे आहे ते सर्व सरळ सांगून टाकतो , त्याच बरोबर पोलिग्राफ च्या मदतीने शरीरातील बदल देखील नोंद केले जातात, या अवस्थेत  सांगितलेल्या सर्वच गोष्टी खऱ्या असतील असे होत नाही काही काही गोष्टी या खोट्या सुद्धा असू शकतात, पण या टेस्ट मुले पोलिसांना काही धागेदोरे मात्र नक्कीच सापडतात, आणि त्यांना तेव्हडे पुरेसे देखील आहे. तर याच सर्व गोष्टीला नार्को टेस्ट म्हटले जाते.