प्लाझ्मा म्हणजे काय ?आणि ते कसे काम करते

पपई खाल्याणे शरिराला होनारे फायदे!

आपण आपल्या शेतात पपई लावतो झाडाला पपई येतात आपण खातो, हे सर्व ठीक आहे पण या पपईचे फायदे काय आहेत हे मात्र माहित नाही चला जाणून घेऊ काही महत्वाचे फायदे. 
पपई च्या पानांपासून ते पपई च्या खाल्लेल्या भागापासून सुद्धा उपयोगी गोष्टी बनवता येतात, मुख्यत्वे पपई मध्ये असनारे जीवनसत्वे शरीरास आवश्यक असलेली कमी भरून काढतात. पपई मध्ये व्हिटॅमिन -अ आणि व्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात असते, व्हिटॅमिन अ मुळे आपली दृष्टी सुदृढ होण्यास मदत होते डोळ्याच्या संबंधीत असणारे  आजार कमी होतात तर व्हिटॅमिन सी मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते व्हिटॅमिन सी शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते शरीराचा थकवा भरून काढण्यासाठी शरीराला ताकत मिळण्यासाठी मदत होते म्हणून जेव्हा आपण पपई खातो तेव्हा आपला थकवा दूर होतो.
तसेच पपई चा जपयोग आपली त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा महत्वाचा ठरतो. 
त्वचा काळी पडणे, सुरकुत्या पडणे, चव्हाऱ्यावर वांग येणे अशे आजार सहज बरे होतात तर, केसांची वाढ, केसातील कोंडा रोखणे, केस मऊ बनवणे हे देखील फायदे पपई पासून मिळवता येतात. 
औषधी म्हणून सुद्धा पपईचा वापर केला जातो, लठ्ठ व्यक्तीचे वजन कमी करण्यासाठी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यावर उपचार करण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. 
पपई मध्ये विविध क्षार सुद्धा आढळतात उदा. फॉस्फोरस,लोह, कॅलशियम इ.
पपई आपल्या शरीराला विविध विषाणू, ऍलर्जीस कारणीभूत घटकांशी लढण्यास मदत करते व गंभीर आजार होण्यापासून बचाव करते.
कर्करोगाचा धोका कमी करते,जखम भरण्यासाठी, नसांशी संबंधित आजार, अर्थरिटीस, यांसारखे आजार सुद्धा पपई मुले कमी होऊ शकतात. 
त्याच बरोबर पपई पासून इतर उत्पादन सुद्धा बनवले जातात जसे 
कँडी, जॅम,जेली,चेरी, ज्युस, यांसारखे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जातात. 

 पपई च्या रुचीक (पांढरे दूध) सुद्धा उपयोग होतो त्यापासून पेपैन नावाचा पदार्थ बनवला जातो त्या पदार्थाचा वापर टूथपेस्ट, टूथ व्हाईटनर, आणि विविध औषधी मध्ये सुद्धा केला जातो.