प्लाझ्मा म्हणजे काय ?आणि ते कसे काम करते

१८ वर्षांवरील लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी

सरकारने नुकतीच सरसकट मोफत लसीकरणाची घोषणा केली होती , २८ एप्रिल पासून १८ वर्षांवरील  सर्वांसाठी नोंदनीही सुरु होणार होती पण सरकारने काही कारणास्तव ते पुढे ढकलले आहे. पण लसीकरणासाठी नोंदणी कशी करतात ती १८ वर्ष असो की ४५ सर्वांसाठी सारखी आहे ती पद्धत आपण जाणून घेऊ. 
१.सर्वात अगोदर आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर ब्राऊसर उघडा. 
2.त्यानंतर URL म्हणजे जेथे आपण वेबसाईट टाईप करतो तिथे वेबसाईट टाका 
वरील लिंक वर क्लिक करा


3.ही वेबसाईट टाकल्यावर आपल्या समोर एक पेज उघडेल तिथे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर नमूद करा आणि खाली असलेल्या GET OTP या बटनावर क्लिक करा.


4.त्यानंतर तुमच्या मोबाईल वर सहा अंकी पावर्ड असलेला मेसेज येईल ते सहा अंक पुढील आलेल्या पेज वर नमूद करा आणि VERIFY या बटनावर क्लिक करा.


5.पुढे एक WELCOME पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्या पेज वर असणाऱ्या REGISTER MEMBER या बटनावर क्लिक करा.


6.त्या पुढील पेज वर तुम्हाला आपली माहिती भरावयाची आहे,
त्यामध्ये तुमचा फोटो असलेले ओळखपत्र निवडायचे आहे, तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड,मतदान कार्ड ई. वापरू शकता.


7. त्या खालील ओळींमध्ये तुम्ही निवडलेल्या ओळ्खपत्रावरील नंबर टाकायचा आहे  उदा. जर तुम्ही ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड निवडले असेल तर तिथे पॅन नंबर लिहायचा आहे, आधार कार्ड निवडले असेल तर आधार नंबर लिहायचा आहे.


8.त्यानंतर आपले संपूर्ण नाव आणि लिंग नमूद करायचे आहे.
9. त्याखालील ओळीमध्ये आपले जन्म वर्ष जे आपल्या ओळ्खपत्रावर आहे ते लिहायचे आहे.
10.सर्व माहिती भरून झाल्यानंतर REGISTER या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल वर INDIVIDUAL REGISTERED SUCCESSFULLY असा मेसेज दिसेल.


11. त्यानंतर तुम्ही थेट तुमच्या अकाऊंट पेज वर जाल तिथे तुमची संपूर्ण माहिती जमा झालेली असते.
12.एका नंबर वर तीन registration होतात  त्यासाठी अकाउंट पेज वर add member नावाचे बटन दिलेले आहे. 



लसीकरणासाठी तारीख आणि वेळ कशी निवडावी 

1.तुमचा पहिला डोस मिळवण्यासाठी तुमच्या अकाउंट पेज वर दिसणाऱ्या  Shedule या बटनावर क्लिक करा. 
2. तुम्ही ऍड केलेले मेम्बर या सर्वांची डोस घेण्याची तारीख सर्वांची सारखी असणे गरजेचे आहे त्यारीख आणि वेळ सर्वांचा एकाच दिवसाचा निवडावा. 
3.shedule ला बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीन वर shedule now असा मेसेज येईल त्यावर क्लिक करा.


4. Shedule Now या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही Book Appointment for vaccination या पेज वर जाल.
5.या पेज वर खालील बाजूस पिन कोड टाकून आपले जवळचे लसीकरण केंद्र आपण शोधू शकता.


6.स्क्रीन वर दिसत असलेल्या लसीकरण केंद्रावर कुठे कोणत्या वयातील लसीकरण केले जाते हे लाल अक्षरात लिहिलेले दिसेल. तुमच्या वयानुसार लसीकरण केंद्र निवडावे.


7.लसीकरण केंद्राच्या नावसमोरच तारीख आणि त्या तारखेला उपलब्ध असलेल्या जागा दिसतील त्यातील एक तारीख निवडावी. 


8.तारीख निवडल्यानंतर पुढील पेज वर TIME SLOT हे पेज येईल तिथे आपण आपल्याला आवश्यक तो वेळ निवडावा आणि Comfirm या बटनावर क्लिक करावे.



9. तुमची नोंदणी पूर्ण झालेली आहे 
10. तुम्ही तुमच्या अकाउंट पेज वरून वेळ निवडलेल्या पार्वतीची कॉपी डाउनलोड करू शकता . किंवा हवी असल्यास आपली तारीख आणि वेळ हि बदलू शकता . 

धन्यवाद